गावा विषयी माहिती
मौजे पशिचम कौठा हे गाव नेवासा तालुक्यातील पावनभूमीत वसलेले आहे. ज्या भूमीत सातशे वर्षांपूर्वी जगाला दिशा दाखवणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा पवित्र ग्रंथ लिहिला अशा तालुक्यात हे गाव वसलेले आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ज्या जिल्ह्यामध्ये झाला अशा अहिल्यानगर जिल्ह्यात कौठा हे गाव वसलेले आहे. नेवासा पासून कोठा गावाचे अंतर २४ कि.मी. आहे, तसेच प्रसिद्ध शनिशिंगणापूर पासून कौठा गावाचे अंतर १४ कि.मी. एवढे आहे.
.


२०११ च्या जनगणनेनुसार गावाची २७६६ इतकी लोकसंख्या आहे. त्यामध्ये पुरुष १४३४ आणि महिला १३३२ आहेत. अनुसूचित जातीची/जमातीची लोकसंख्या ६८९ इतकी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ५७७ इतकी आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ११२ इतकी आहे. गावातील साक्षरतेचे प्रमाण — इतके आहे. कोठा गावाचे एकूण क्षेत्रफळ —- हेक्टर इतके आहे.
गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्याबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. गावातील शेती ही मुळा कॅनॉलवर अवलंबून आहे. गावात इयत्ता १ ते ४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेचा परिसर अगदी हिरवाईने नटलेला आहे. त्यात गावातील १५६ मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर गावात गावठाण, अंगणवाडी, गावठाण २, दरदले वस्ती, हनुमानवाडी अशा ४ अंगणवाड्या आहेत. गावात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षणासाठी राजे संभाजी माध्यमिक विद्यालय आहे आणि परिसरातील ४०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
तसेच गावाच्या परिसरात काळे वस्ती, भासार वस्ती, शेळके वस्ती, चक्रनारायण वस्ती, डेरे वस्ती, वाघ वस्ती, दरंदले वस्ती, हनुमान वाडी अशा वस्त्या आहेत.
गावात प्राचीन काळातील श्रीराम मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चिदंबरम स्वामी मंदिर, यमाई देवी मंदिर आहे.
मुख्य पिके: ऊस, कपाशी, गहू, सोयाबीन, तूर, हरभरा.
फळबागा: डाळिंब, केळी.




